"धाराशिव फाउंडेशन" तर्फे आपले मनःपूर्वक स्वागत
धाराशिव जिल्ह्याच्या नवनिर्मितीचं आणि उत्कर्षाचं व्यासपीठ
"आपला जीव धाराशिव" हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या नवनिर्मितीसाठी, उत्कर्षासाठी आणि जिल्ह्यातील कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पर्यावरण, पर्यटन, क्रीडा, महिला, युवक सक्षमीकरण यासह इतर सर्व घटकांच्या रचनात्मक दीर्घकालीन विकासासाठी निर्माण झालेले सामूहिक व्यासपीठ अर्थात "धाराशिव फाउंडेशन"।
धाराशिव जिल्ह्याला अध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिकी असा समृद्ध वारसा आहे.
एखाद्या जिल्ह्याची प्रगती तेव्हाच होते, जेव्हा त्यातील प्रत्येक खेडे, प्रत्येक गावाची आणि त्यातील सर्वसामान्य जनतेची सर्वांगीण प्रगती होते.

धाराशिव फाउंडेशन
"आपला जीव धाराशिव"
ध्येयवादी दृष्टिकोन
स्पष्ट उद्दिष्टे आणि योजनाबद्ध कार्यान्वयन
सामुदायिक एकता
सर्व घटकांचे सामूहिक सहकार्य
सेवाभावी कार्य
निस्वार्थ सेवा आणि समर्पण
नाविन्यपूर्ण विचार
आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञान
नोंदणी करा
"धाराशिव फाउंडेशन" हि संस्था धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्व घटकांच्या उत्कर्षासाठी आपले महत्वाचे योगदान देणार असून या संस्थेशी आपण सर्वांनी जोडले जावे.