"धाराशिव फाउंडेशन" तर्फे आपले मनःपूर्वक स्वागत ..!

"धाराशिव जिल्ह्याच्या नवनिर्मितीचं आणि उत्कर्षाचं व्यासपीठ ..!!

"आपला जीव धाराशिव" हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या नवनिर्मितीसाठी, उत्कर्षासाठी आणि जिल्ह्यातील कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पर्यावरण, पर्यटन, क्रीडा, महिला, युवक सक्षमीकरण यासह इतर सर्व घटकांच्या रचनात्मक दीर्घकालीन विकासासाठी निर्माण झालेले सामूहिक व्यासपीठ अर्थात "धाराशिव फाउंडेशन..!!


धाराशिव जिल्ह्याला अध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिकी असा समृद्ध वारसा आहे. हा वारसा जगासमोर यावा तसेच जिल्ह्याच्या शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार, क्रीडा, पर्यावरण, पर्यटन, महिला व युवक सक्षमीकरण अशा सर्व घटकांच्या वर्तमान व भविष्यातील विकासाच्या, उन्नतीच्या अनेक संकल्पना व योजना धाराशिव फाउंडेशन राबवणार असून त्याची दीर्घकालीन अंलबजावणी संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.


एखाद्या जिल्ह्याची प्रगती तेव्हाच होते, जेव्हा त्यातील प्रत्येक खेडे, प्रत्येक गावाची आणि त्यातील सर्वसामान्य जनतेची सर्वांगीण प्रगती होते यासाठी आपण सर्व मिळून आपल्या नव्या पिढीच्या उत्कर्षाचं आणि उन्नतीचं रोपटं धाराशीव फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून लावत आहोत.


आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून राज्यात आणि देशात आपल्या धाराशिव जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यात आणि धाराशिव जिल्ह्याच्या व जिल्ह्यातील जनतेच्या जीवनात आत्मविश्वासाची, प्रेरणेची, आकांक्षा व स्वप्नं पूर्ण करण्याची एके नवी ज्योत हि संस्था पेटवत आहे या मध्ये धाराशिव फाउंडेशन हि संस्था यशस्वी ठरेल हा विश्वास संस्थेला आपल्या सर्वांच्या माध्यमातून येतो.संस्थेच्या प्रवासात संस्था वाढवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या उन्नतीसाठी आपल्या सर्वांच्या सूचनेचं, कल्पनांचे स्वागत हि संस्था नेहमीच करेल.


चला एका नव्या प्रवासाला आपण सुरवात करूया, एकत्र येऊया, एकत्र राहूया..सर्वांसह पुढे जाऊया.. जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील येणाऱ्या पिढीसाठी नवनिर्मितीचं व उत्कर्षाचं एक रोपटं लावूया आणि त्याला वाढवूया...!


'धन्यवाद ..!

आमची ध्येय

"आपला जीव धाराशिव"

कार्यक्रम

नोकरी महोत्सवात १३४६ उमेदवारांना नोकऱ्या...

धाराशिव फाउंडेशन यांच्या सहकार्याने शिवसेना धाराशिव आयोजित नोकरी महोत्सवाचा शुभारंभ खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील, मा.नंदुराजे निंबाळकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

या नोकरी महोत्सवासाठी धाराशिव येथे ५२१८ उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. तसेच काही उमेदवारांनी ऑफलाईन नोंदणी केली होती. यापैकी ९३० उमेदवारांना नोकऱ्यांचा लाभ व नियुक्तीपत्र देण्यात आली.

कळंब येथे १६२८ उमेदवारांनी नोंदणी केली होती यापैकी ४१६ उमेदवारांना जागेवर नोकरी व नियुक्ती पत्र देण्यात आली.

एकूण ६८४६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३४६ उमेदवारांच्या हाती नोकरीची नियुक्ती पत्र देण्यात आली.

ज्या उमेदवारांना नोकरी मिळाली नाही त्या सर्वांना जॉब कार्डचे वितरण केले आहे. या जॉब कार्डमुळे सर्व उमेदवारांना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कंपन्या व तेथील रिक्त पदांच्या जाहिरातीची माहिती मेसेजद्वारे मोबाईलवर मिळणार आहे.

धाराशिव फाउंडेशन व शिवसेना धाराशिव यांच्या वतीने अश्या प्रकारचा नोकरी दर वर्षी घेण्याचा निर्धार आहे. शिस्तबद्ध व सुनियोजित व्यवस्थेत राज्यातील सुमारे ३५ कंपन्यांनी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, मुलाखती, नोकरी व नियुक्ती पत्र ही प्रक्रिया पूर्ण केली.

Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकर Kailas Patil - कैलास पाटील Dharashiv Foundation - धाराशिव फाउंडेशन #jobfair #आपला_जीव_धाराशिव #धाराशिव_फाउंडेशन

करिअर मार्गदर्शन शिबीर - धाराशिव

(दिनांक १६ जुलै २०२३)

धाराशिव फाउंडेशन आणि युवा सेना धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उध्दवसाहेब ठाकरे आणि धाराशिव लोकसभेचे खासदार मा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

या मार्गदर्शन शिबिरात राज्यातील स्पर्धा परीक्षेतील तज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे श्री. विठ्ठल कांगणे यांनी स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवेतील जबाबदारी आणि श्री. विवेक वेलणकर यांनी दहावी व बारावी नंतरच्या विविध क्षेत्रातील करिअर संधी यावर मार्गदर्शन केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते "युवा गुरू" या करिअर व शैक्षणिक योजनांची मार्गदर्शन माहीती पुस्तिकेचे अनावरण व उपस्थित विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. तसेच आपल्या विद्यादानातून विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

पालकांचे प्रबोधन, ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची जागरूकता, कौशल्य आणि स्पर्धा परीक्षा हा आता नियोजनबद्ध अभ्यासाची सवय, सराव, स्वयंमूल्यमापन तसेच सामाजिक जाणीव व जबाबदारी याविषयी सर्व मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

या करिअर मार्गदर्शन शिबिराला पालक, विद्यार्थी यांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला.

Dharashiv Foundation - धाराशिव फाउंडेशन

#आपला_जीव_धाराशिव #धाराशिव_फाउंडेशन